पलूस

मुळ नांव– पळसगांव, अपब्र्हंश–पळस, पलूस, पलूस तात्कालीन मूळ संस्थान कॉंडील्यापूर आजचे कुंडल पासून सुमारे 5 कि.मी. पांडवकालीन सुमाने 20 फूट पांढ-या मातीच्या अवाढव्य टेकडीवर वसलेले गांव. 200 वर्षापूवी पटवर्धन सरकारांनी हत्ती, घोडे यांच्या विश्रांतीसाठी पलूस हे शांत ठिकाण निवडले, व त्या ठिकाणी ओढे, नाले बांधले. पलूसचा ग्रामपंचायत इतिहास सुमारे 125 वर्षांनी जुना आहे. गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. विशेष म्हणजे पिढयानपिढया एकत्र राहूनही कधीही त्यांच्यात भांडण तंटा झाला नाही. प्रत्येक समाजाचे वेगवेगळे सण साजरे होतात. त्यामध्ये इतर समाजाचे लोक आंनदाने सामील होतात.