उद्योग–
गावाच्या पश्चिम बाजूस डॉ.पंतगराव कदम औद्योगिक वसाहत, पलूस या नावाने मोठी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये पोलाद कारखाने, फॉंड्री, मेटर शॉप, वर्क शॉप, मोटर कारखाने, सोयाबीन प्रकल्प, फॅब्रीकेशन तसेच लहान मोठे मिळून सुमारे 250 उद्योग चांगल्या प्रकारे सुरु आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये लगतच असणा-या किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्करवडी या कारखाण्यामाफर्त कच्चा माल पुरवला जातो. तसेच पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठया शहरांतून या उद्योगांना मोठ–मोठया कामाच्या मागण्या मिळत असतात. वसाहतीची मासिक उलाढाल सुमारे 50 ते 75 कोटी रुपयांची असते. या औद्योगिक वसाहतीमुळे याठिकाणच्या बयाच युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गावाला माल वाहतुकीचा व्यवसाय खुप मोठा आहे. उद्योगाच्यादृष्टीने गाव समृध्द आहे.