सुविधा

–शैक्षणिक सुविधा–

जनता जर साक्षर नसेल तर गावाची आर्थिक, बौध्दीक पर्यायाने सामाजिक प्रगतीसुध्दा होणार नाही. ‘आडाणी आई घर वाया जाई’ या उक्तीप्रमाणे महिला व कन्या निरक्षर असतील तर घर व समाज अंधश्रध्देच्या आहारी जातो.

पलूस शहराच्या विकासाला खालील संस्थांचे फार मोठे योगदान आहे.

  • लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदीर व ज्युनिअर कॉलेज पलूस.

  • कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस.

  • पं.विष्णू दिगंबर पलूसकर विद्यामंदीर व ज्युनिअर कॉलेज, पलूस.

  • भारती कन्याप्रशाला, पलूस.

  • भारती विद्यापीठ संचलित इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी पलूस.

  • यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस.

  • मा. श्री. वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था संचलित समर्थ प्रायमरी इंग्लिश स्कुल, पलूस.

  • जवाहर नवोदय विद्यालय, पलूस.


  • डॉ. झाकीरहुसेन निवासी स्कुल, पलूस.

  • यशोदा बालविकास मंदीर, पलूस.


अशा 10 खाजगी शाळा व जिल्हा परिषदेच्या 9 शाळा व 19 अंगणवाडया असून खुप मोठया संख्येने मुले–मुली शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

पलूस तसेच पलूस तालूक्याला अन्यत्र कोठेही शिक्षणासाठी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे याठिकाणी पलूस परिसरातील कुंडल, आंधळी, रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, सावंतपूर, आमणापूर, येळावी, बांबवडे अशा मोठया व छोटया खेडयातील मुले पलूसला शिक्षणासाठी मोठया संख्येने येत असतात. गावाला अंगणवाडीपासून अगदी इंजीनिअरींग कॉलेजपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. अत्यंत चांगले शिक्षकवर्ग व सुसज्य इमारत यामुळे व खेळण्यासाठी क्रिडांगणी सोय उपलब्ध आहे.