राजकीय व्यक्तिमत्वे–
- कै. कृष्णाजी रामचंद्र कु-हाडे–
- सरपंच 1937 ते 1944 प्रथम सरपंच.
- कै. केशव गंगाराम देवळे–
- उपसरपंच 1937 ते 1944 प्रथम उपसरपंच.
- कै. सखाराम बापू ठाणेकर–
- पलूस गावातील राजकीय व सामाजिक घाडामोडीला मोठा सहभाग पलूस ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून 1953 ते 1958 काम पाहिले.
- कै. ज्ञानदेव विठोबा पाटील–
- पलूस गावातील पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ.पतंगराव कदम यशवंत पाणीपुरवठा पलूस सहकारी बॅंक इत्यादी संस्थांची स्थापना करुन पलूसच्या सर्वांगीण विकासाला अमुल्य योगदान तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती म्हणून गौरवशाली कार्यकाल कै.यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावान अनुयायी.
- श्री.शंकर केशवराव पाटील(काका)–
- पलूस शिक्षण प्रसारक मंडळ व पलूस औद्योगिक वसाहत तसेच विकास फौंड्री या सहकारी तत्वावरील उद्योगाची उभारणी व त्याद्वारे पलूस गावच्या सर्वांगीण विकासात भर घातली.
- श्री. वसंतराव पांडूरंग पुदाले (दादा)–
- पलूस सहकारी बॅंक, डॉ.पतंगराव कदम यशवंत सहकारी पाणी पुरवठा योजना, वसंत दुध उत्पादक केंद्र या माध्यमातून तसेच सलग 11 वर्षे पलूस गावचे सरपंच या पदावर निवडून येवून त्यांनी पलूसच्या विकासाला तसेच पलूस परिसरातील अनेक वाडी वस्त्यांवरील विकासाला मोठे योगदान. तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुका अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना यासारख्या अनेक योजनांवर काम करताना त्यांनी पलूस परिसरातील व तालुक्यातील गरीब गरजू कुटुंबांना या योजनांचा प्राधान्याने लाभ मिळवून दिला.
- श्री. खाशाबा यशवंत दळवी (आण्णा)–
- सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती या पदाद्वारे व पलूस ग्रामपंचायत व विविध सहकारी संस्थांच्याद्वारे पलूस गावच्या विकासाला मोठे योगदान.
- श्री. विठ्ठलराव बबन येसुगडे(बापूसाहेब)–
- पलूस ग्रामपंचायतीमध्ये 1997 ते 2002 ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पहिले. गावाला संग्राम उद्योग समुह स्थापन करुन व पलूस औद्योगिक वसाहत व पलूस ग्रामपंचायत माध्यमातून पलूस गावचा सर्वांगिण विकास करण्यात मोठे योगदान. सन 2002 ते 2007 या पाच वर्षात सर्व जाती–धर्मातील लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळावी म्हणून 1 वर्ष सरपंच असा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला अनेक विकास योजनांद्वारे गावाचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
- गावातील वाढणारी लोकसंख्या व लोकवस्ती लक्षात घेता निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची मुख्य अडचण दुर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या विभागामाफर्त पलूस गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना करण्याचे काम त्यांनी आपल्या सहकायांच्या सहाय्याने हाती घेतले हे लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती या पदाद्वारे पलूस व पलूस परीसराच्या विकासाचा ध्यास व दुरदृष्टी ठेवून काम करणारे नेतृत्व व संग्राम शिक्षण प्रसारक मंडळामाफर्त शैक्षणिक क्षेत्राला मोठे कार्य हाती घेतले.
- श्री. भिवाजी राजाराम पाटील (तात्या)–
- पलूस गावचे 1967 ते 1972 या काळाला उपसरपंच पद भुषविले. तसेच श्री.समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्ट, पलूस चे अध्यक्ष व त्याद्वारे दरवर्षी गावयात्रा भरवणे व त्याचे नियोजन करणे. कै. तुकाराम गोंदील, कै. विनाश कुलकर्णी इ. जेष्ठ व्यक्तिमत्वांनी पलूसच्या राजकीय इतिहासाला मोलाची भर टाकली आहे.