रोजगाराची उपलब्धता

रोजगाराची उपलब्धता–

  • गावाला 250 लहान मोठे कारखाने असणारी औद्योगिक वसाहत असून त्याठिकाणी पलूस व पलूस परिसरातील अनेक कुशल व शिकावू कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. पलूस गावापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी हा कारखाना असल्यामुळे परिसराला रोजगार चांगला मिळतो. तसेच गावाला पारंपारिक शेती व्यवसाय केला जात असल्यामुळे बयाच मोठया प्रमाणावर शेतीमधून खुप मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. आज गाव हिरवेगार व समृध्द आहे.
  • गावाला तरुणांनी अत्याधुनिक फळशेती व फल शेतीवर मोठया प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. शेतीमालाला पुणे, मुंबई, दिल्ली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी असल्यामुळे चांगल्या प्रतीचा माल उत्पादीत करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यातूनही रोजगार उपलब्ध झाला आहे.