पायाभुत सुविधा–
- गावातल्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे.
- गाव आणि वाडी वस्त्यांना जोडण्यासाठी खडी मुरमाचे रस्ते तयार केले आहेत. शिवाजीनगर, कृषीनगर गोंदीलवाडी भारतीनगर अंबाबाई मळा इनामपट्टा पलूस कॉलनी म्हाडा कॉलनी येथे जाण्यासाठी चांगल्याप्रकारचे रस्ते आहेत.
- त्याचप्रमाणे रस्त्यावर विजेच्या दिव्यांची सोय केली आहे.
- नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय सध्या पलूस व इतर 16 गावासाठी तयार करण्यात आलेल्या कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेमाफर्त पिण्याच्या पाणीपुरवठा गावाला होत असते. सदरचे पाणी घोगांव या ठिकाणी जॅकवेल बांधून कुंडल या गावाला मुख्य पंप हाऊस असून त्याठिकाणहून पाणी पलूस येथल बैठया टाकीमध्ये येते व त्या टाकीमधून वितरण नलिकेद्वारे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो.
- गावाला एकूण 102 सीटची 24 सार्वजनिक शौचालये आहेत.
- गावाला एस.टी, जीप्स व 6 व 3 आसनी रिक्षा या दळणवळणाच्या सोयी आहेत.
- पलूस व पलूसच्या आसपासच्या गावातून मुंबई पुणे व परराज्याला मोठया प्रमाणावर लोक उद्योगधंदे शिक्षण व व्यवसायासाठी जात असतात.
- त्याठिकाणी त्यांना ये–जा करणेसाठी पलूस या ठिकाणी तासगावाहून मुंबईसाठी सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा दोन एस.टी दररोज असतात.
- तसेच पलूस पासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन आहे.